सुखकर्ता फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल येथील सुखकर्ता फाउंडेशनचे अध्यक्ष व अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर काही संस्थेच्या पदाधिकारी समवेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अवयवदान प्रतिज्ञा भेट देण्यात आली तर नीलिमा अहिराव व विमल जोशी या दोन किडनी दातांच्या सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिवंतपणी आपल्या शरीरातील अवयव दान करून कुटुंबातील प्रिय व्यक्तीचे जीव वाचविणाऱ्या ह्या दोन्ही महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन आनंद डायलिसिस सेंटर, आर्या फाउंडेशन व सुखकर्ता फाउंडेशन या अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांनी याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे अवयव दान मोहिमेत गती मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांना सहकार्य करण्यासाठी साकडे घालण्यात आले.

जिल्ह्यात जिल्हा अवयवदान समितीची स्थापना झाली पाहिजे जिल्ह्यात मेंदू मृत जाहीर करण्यासाठी असलेल्या समित्या कार्यान्वित करणे मृत झालेल्या रुग्णांचे अवयव काढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध व्हावी व तशी कायदेशीर परवानगी मिळावी तसेच सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे अवयव दान संकल्पपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी व विभागीय प्रत्यारोपण समितीचे उपकेंद्र जळगावात व्हावे अशा सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांनी या सर्व विषयाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पदाधिकारी यांना अवयव दान मोहिमेला सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन सर्व अवयव दाते व पदाधिकारी यांच्या कार्यास व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

Leave A Reply

Your email address will not be published.