सिताबाई गावडे यांचे अल्प आजाराने निधन

0
शिरुर(प्रतिनिधी) – तालुक्यातील टाकळी हाजी येथील रहिवासी असलेल्या सौ. सिताबाई भानुदास गावडे यांचे मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. टाकळी हाजी आणि परिसरात अत्यंत शिस्तबद्ध सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावामुळे त्यांना सर्व लोक आपले मानत असत. त्या परिसरातील लोकांच्या सुख आणि दुखात नेहमी सामिल होत असत. उच्च आचार आणि विचारांच्या त्या  पुरस्कर्त्या होत्या. अत्यंत सुसंस्कृत परिवार म्हणुन त्यांनी आपल्या परिवाराची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पती श्री. भानुदास बाबु गावडे, दोन मुले अनुक्रमे श्री. धोंडीभाऊ भानुदास गावडे व श्री. संतोष भानुदास गावडे, एक मुलगी सौ. आशा पोपट हिलाळ तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. पोलिसमित्र श्री. धोंडीभाऊ भानुदास गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक ३० जानेवारी टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे येथे सकाळी ८ वाजता होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.