जळगाव ;- येथील भरारी फाऊंडेशनतर्फे उल्लेखनीय कार्य करणार्या 17 व्यक्ती आणि 3 संस्थांना अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ‘उत्तुंग भरारी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लबच्या पटांगणात शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी मंचावर सिंधुताई सपकाळ यांसह आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, अनिल कांकरीया, रजनीकांत कोठारी, रविंद्र लढ्ढा उपस्थित होते.
याप्रसंगी महाबळ परिसरात राहणार्या उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींमध्ये चिंतामण पाटील, नामदेव मोरे, भास्कर जुनागडे, पुंडलिक पाटील, दुष्यंत जोशी, आर.डी. कोळी, सुलभा कुळकर्णी, संजय पत्की, चंद्रशेखर जोशी, प्रा.संजय बडगुजर, गोपाळ कापडणे, प्रा.डॉ.संध्या सोनवणे,
योगेश शुक्ल, वैशाली पाटील, रामचंद्र पाटील, स्वप्ना भट, प्रणाली सिसोदीया तर सेवाभावी संस्थांमध्ये स्नेहल प्रतिष्ठान, ओंकारेश्वर भजनी मंडळ, शासकीय नर्सिंग महाविद्यालयास उत्तुंग भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दीपक परदेशी तर सुत्रसंचालन गिरीष कुळकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी विनोद ढगे, योगेश हिवरकर, अनिल जावळे, निलेश झोपे, गोपाळ कापडणे, नेहा बोरसे, दुर्गेश आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.