सिंगलयुज प्लास्टिक मुक्त बोदवड करण्यासाठी नगरपंचायतीची धडक कारवाई

0

कारवाईत १० हजार दंड व ४० किलो सिंगलयुज प्लास्टिक जप्त 

बोदवड – शासनाने सिंगलयुज प्लास्टिक वर बंदी घातल्याने नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्लास्टिक वापरणा-यांवर दि.२० रोजी धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी शहरातील भाग्यश्री प्लास्टिक,राधेक्रिष्णा ट्रेडिंग या दुकानांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार असा एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आली असून त्यांच्याकडील ४० किलो सिंगलयुज प्लास्टिक जप्त करण्यात आली.

सदरच्या कारवाई नगर पंचायत कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण,शहर समन्वय अक्षय जगताप,पाणी पुरवठा अभियंता श्री.कोलते, बांधकाम अभियंता रितेश बच्छाव,आरोग्य निरीक्षक मनोज छपरीबंद,यांचेसह नगर पंचायत कर्मचारी यांचा समावेश आहे.

शासनाच्या सिंगलयुज प्लास्टिक बंदी या मोहिमेची नगर पंचायत मार्फत अंमलबजावणी सुरू असून येत्या काही काळात प्लास्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.तरी पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.