जळगाव | साेशल मीडियावर चिठ्ठी अपलोड करुन एका तरुणाने वावडदा शिवारात शेतात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली आहे. सुपडू दिनकर पाटील (रा. कुऱ्हाडदा, ता. जळगाव) असे त्याचे नाव अाहे.
दरम्यान, विष प्राशन करण्यापूर्वी तरुणाने मित्राला व्हिडीओ कॉल केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात अाल्याने त्याचे प्राण वाचले अाहे. मित्र व इतर नातेवाइकांनी शेतात धाव घेऊन त्याला देवकर आयुर्वेद रुग्णालयात पाठविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयात तातडीने हलवण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.