जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील रहिवासी तथा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यकार डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत” दिनांक 6/7/8 2022 रोजी पवित्र तीर्थ क्षेत्र मेवाड राजस्थान येथे आयोजित साहित्य संमेलनात “राष्ट्रीय साहित्य सौरभ” या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
तीन दिवसीय ह्या संमेलनाचे आयोजन नाथद्वारा येथील “साहित्य मंडळ संस्था नाथद्वारा” संस्थेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. या संस्थेची स्थापना भारताच्या स्वतंत्रता पूर्वी म्हणजे ८५ वर्षापूर्वी या संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय भागवती प्रसाद देवपुरा यांच्याद्वारे स्थापित करण्यात आली होती.
स्वर्गीय भगवती प्रसाद देवपुराजी देश आणि विदेशात प्रसिद्ध हिंदी साहित्यकार होते. यांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाचे आयोजन दर वर्षी साजरा केला जातो. या संमेलनात देशाच्या किमान 150 साहित्यकार सहभागी होतात. ह्या कार्यक्रमात डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत “यांना त्यांच्या रचना धर्मिता व उत्कृष्ट लेखना बाबत हा पुरस्कार देण्यात आला..