सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुकात्यातील पिंपळगाव खुर्द येथे  सासरचांच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार  उघडकीला आला. माहेरच्या मंडळीच्या फिर्यादीवरून पतीसह सासू व नणंद यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक केली आहे.

ज्योती अनिल सपकाळे (वय ३२, रा. पिंपळगाव खूर्द) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीनुसार ज्योती सपकाळे  यांचा विवाह पिंगळगाव खूर्द येथील अनिल वसंत सपकाळे यांच्याशी २०१३ मध्ये रितीरिवाजानुसार झाला होता. दरम्यान पती अनिल यांनी पत्नी ज्योतीवर चरित्र्याचा संशय घेवून नेहमी शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याचप्रमाणे सासू शकुंतलाबाई वसंत सपकाळे आणि नणंद योगीत गजानन सोनवणे सर्व रा. पिंपळगाव खूर्द यांनी विवाहितेला शिवीगाळ व टोमणे मारणे सुरू केले. पती अनिल सपकाळे, सासू आणि नणंद यांच्या रोजरोजच्या छळाला कंटाळून विवाहिता ज्योती यांनी ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी पती, सासू आणि नणंदवर आरोप केला. अखेर १ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता विवाहितेचा भाऊ सुर्यधन आंबादास कोळी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताच वरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी पती अनिल सपकाळे याला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.