अमळनेर | प्रतिनिधी
दि.२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती चे औचित्य साधत शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजनेचा जळगाव जिल्ह्यातून शुभारंभ करण्यात आला. सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना ही मा.आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतुन मा. अशोकजी बेलसरे राज्याध्यक्ष शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य,नवनाथजी गेंडसर राज्याध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनातून मा.सुभाषजी मोरे सर कार्याध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य,मा.जालिंदरजी सरोदे सर, प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य व मा.प्रकाशजी शेळके कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य,प्रकाशजी दाणे कार्याध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक , भरतजी शेलार सरचिटणीस शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य यांच्या अभ्यासपुर्ण नियोजनातून योजना सादर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातून ५०० शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबांचा समावेश सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेत केलेला आहे.सर्व सभासदांचे स्वास्थ्य कार्ड तयार करण्यात आले आहेत. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती चे औचित्य साधत सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेचा zoom app द्वारे ऑनलाईन शुभारंभ मा.आमदार कपिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदर योजना डाॅ. नरेद्र पाटील यांच्या युनिक हेल्थ केअर प्रा.लि.कंपनी मार्फत राबवली जात आहे. सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना ही योजना संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा शिक्षक भारती संघटनेचा मानस आहे. नारायण आनंदा वाघ,जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव ,सोमनाथ ब्रिजलाल पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक जळगाव तसेच शिक्षक भारती माध्यमिक व प्राथमिक चे सर्व पदाधिकारी यांनी कोविळ-१९ ह्या महामारी च्या काळातही जीवाची पर्वा नकरता शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांना भ्रमणध्वनी तसेच प्रत्यक्ष भेट घेवून सदर योजनेचे महत्व पटवून दिले, योजनेचे फॉर्म जमा करुन योजना पुर्णत्वास नेण्याचे कार्य पार पाडले. आॕनलाईन सभेच्या अध्यक्ष स्थानी प्राथमिकचे राजाध्यक्ष नवनाथ गेंड होते,तर प्रमुख पाहूणे मा.आमदार कपिल पाटील तथा राज्य पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष होते प्रास्तविक प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी केले,सभेत डाॕ.नरेंद्र पाटील मा.कपिल पाटील,नवनाथ गेंड,सुभाष मोरे,राजेंद्र लोंढे,सुशिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, आभार नारायण वाघ यांनी मानले आॕनलाईन सभेचे व्यवस्थापन शिक्षक भारती प्राथमिकचे कार्यवाह प्रभात तडवी,राहूल चौधरी यांनी केले.फेसबूक लाइव्ह च्या माध्यमातून 1000 लोकांनी सभेत सहभाग नोंदविला.