सावधान ! चोवीस तासात बारा जणांचा मृत्‍यू; १०९३ नवे रुग्ण

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. मंगळवार जिल्ह्यासाठी चिंता वाढविणारा ठरला. गेल्या २४ तासांत १२ जणांचा बळी गेला, तर नवे १०९२ रुग्ण समोर आले. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ३५६, जळगाव तालुका-३६; भुसावळ ६६, अमळनेर-७६; चोपडा-१००; पाचोरा-१२; भडगाव-१२; धरणगाव-७०; यावल-४३; एरंडोल-५५; जामनेर-३१; पारोळा-२५; चाळीसगाव-९५; मुक्ताईनगर-३३; बोदवड-३३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७९ हजार ५६३ वर गेली आहे. त्यात ६८ हजार ०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज १२ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृताच एकूण आकडा १५१३ वर गेला आहे.  जिल्ह्यात ९ हजार ९७७ रुग्ण उपचार घेत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.