सावदा (प्रतिनिधी) । सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात एकुण सहा रूग्ण कोरोनाबाधित आढळून आलेत. त्यामुळे सावद्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४४ वर गेला असल्याची माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
आढळून आलेल्या रूग्ण पाटीलपुरा २, जगामाता मंदिर ३ आणि गिरीमढी १ असे 14 वर्षाची मुलगी, 75 वर्षाची आजी, 56 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. सावद्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४४ वर पोहचला आहे. यात एकुण मृतांची संख्यात सात झाली आहे. यापैकी ३ रूग्ण उपचार घेत असून उर्वरित ३४ रूग्ण कोरोनामृक्त झाले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे.



