एकबार दिलं से रक्षा ताई फिरसे म्हणत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा :- सावदा येथे खासदार रक्षाताई खडसे यांचे प्रचारार्थ होम टू होम प्रचारफेरी शिवसेना भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक मतदार पर्यंत पोहचत असून महा युतीला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन करीत प्रचार केला . होम टू होम जाउन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. घोषणांनी दणदणीत सुरवात , भाजपा शिवसेना रासप महायुतीचे पदाधिकारी , कार्यकर्ते एकत्र येऊन एकदिलाने प्रचार करीत असून , नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .एकबार फिर से रक्षा ताई फिरसे असे म्हणून नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे .
लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिता येवले , नगरसेविका जयश्री नेहते , रंजना भारंबे, लीना चौधरी , माजी नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे , आदी स्त्री शक्तींचा सक्रीय सहभाग नगरसेवक नगरसेवीका व शिवसेना पदाधिकारी दूध फेडरेशन संचालक जगदीश बढे,बाजार समिती संचालक पंकज येवले,सैय्यद अजगर, शिवसेना रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद पाटील,माजी नगरसेवक लाला चौधरी,शिवसेना तालुका उपप्रमुख शामकांत पाटील,शहर प्रमुख भरत नेहते,सचिव शरद भारंबे,गटनेते अजय भारंबे,भाजपा शहर अध्यक्ष पराग पाटील,सचिन बरहाटे,युवमोर्चा राजेश पाटील,विजय पाटील,अतुल नेहते, यांनी स्वतःच्या हाताने पत्रके वाटून लोकांशी संवाद साधत आहे गावक-यांनी सुद्धा आनंदाने स्वागत करीत एकबार फिर से रक्षा ताई फिरसे असे म्हणून प्रतिसाद दिला .
या प्रचार फेरीचा मार्ग मढी परिसर , कोष्टीवाडा , काझीपुरा, बेंडाळेवाडा, अब्दुल हमीद चौक, इंदीरा चौक, पाटील पुरा, क्रांती चौक, लेंडी गल्ली, मोठा आड, जोशी वाडा, स्वामिनारायण मंदीरगवत बाजार,पाटील पुरा,वंजारी वाडा, शिवाजी चौक,जगमाता चौक,मोठा आखाडा, चांदणी चौक,बुधावरा, स्टेशन नाका,इंगळे वाडा,म्हाळसा देवी चौक, परीसर, ओम कॉलनी असा होता . या प्रचारफेरीत सर्व कार्यकर्त्यांचा भर गललीबोळातील मतदाराची सदिच्छा भेट घेण्यावर होता .