फैजपूर प्रतिनिधी: सावदा येथील रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डब्याचे कोविड आयसोलेशन / ऑक्सिजन सेंटर उभारा खासदार रक्षा खडसे यांचे कडे केली सावदा शिवसेनेने ऑनलाईन निवेदन देऊन मागणी.
रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे प्रतिनिधीत्व करित असून या मतदार संघात संघात रावेर मुक्ताईनगर , यावल या तालुक्या सह भुसावल तालुक्यात कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यामध्ये रुग्णांना वेळेवरती बेड व सेवा उपलब्ध नसतात.
तसेच शासकीय कोविड सेंटर मधेही बेड उपलब्ध नाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या असल्याने आपण पुर्व तयारी म्हणून रेल्वे मार्फत सुरु असलेली रेल्वे डब्यांची कोविड सेंटर सावदा रेल्वे स्टेशन येथे सुरु करावे कारण सावदा रेल्वे स्टेशन हे चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे रेल्वेचे रेल्वे डव्यांचे कोविड सेवा केंद्र करणे करणे उचीत राहिल या स्टेशनवर गर्दी हि नसते व येथे माल धक्का असल्याने रेल्वे ये-जा करणाऱ्या गाड्यांना याचा त्रास होणार नाही.तरी महाशय खासदार साहेबांनी या आमच्या मागणीचा व या मध्यवर्ती ठिकाणाचा विचार करुन सावदा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेचे रेल्वे डब्यांचे कोविड सेंटर तत्काळ सुरु करावे अशी आग्रहाची मागणी शिवसेना शहर प्रमुख भरत वसंत नेहेते ,तालुका उप प्रमुख धनंजय वासुदेव चौधरी ,माजी नगरसेवक शाम वसंत पाटील ,शिवसेना रावेर क्षेत्र प्रमुख मिलींद सुरेश पाटील ,संघटक शरद गिरधर भारंबे यांच्या निवेदनावर सह्या आहेत .
हे निवेदन खासदार रक्षा खडसे यांना ऑनलाईन पद्धतीने इमेल व ट्विटर द्वारे पाठवण्यात आले आहे .निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,भाजपा महाराष्ट्र कार्यालय यांना पाठवण्यात आल्या आहेत.