सावदा येथे आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नाने कॉन्टेंटमेन झोन मधून सूट ; शेतकऱ्यांना दिलासा

0

सावदा (प्रतिनिधिनी) – सावदा येथे गेल्या में महिन्याचे मध्यात कोरोनाचे पेशेन्ट आढळून आल्याने येथील गांधी चौक, संभाजी चौक सह इतर बराच परिसर कॉन्टेंटमेन झोन म्हणून सील करण्यात आला होता याच भागात जिल्हा बँक व सहकारी दूध डेअरी असून अंसख्य शेतकऱ्यांना यथेच काम पड़त असते मात्र गत एक ते दिड महिन्या पासुन हा भाग सील असल्याने शेतकऱ्यांनची अनेक महत्वपूर्ण कामे एन पेरणीच्या तोंडावर अडकली होती त्यामुळे हाभाग लवकर मोकळा करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसा पासुन होत होती मात्र प्रशासना कडून याविषयी सकारत्मक हालचाली होताना दिसत नव्हत्या.

अखेर आ चंद्रकांत पाटील यांचे कानापर्यन्त ही अडचण पोहचल्यावर त्यानी तात्काळ याविषयी अधिकारीवर्गाशी बोलणे केले व यातून मार्ग कसा कढ़ता येईल यावर चर्चा केली व शेवटी दी २२ रोजी याबाबत सकारत्मक निर्णय घेण्यात आला. जिल्हा बैंक व दूध डेरी असणारा परिसरातील सील केलेला काही भाग मोकळा करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांनची अनेक अडकलेली कामे मार्गी लागणार आहे. हा भाग मोकळा करतांना मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठान, सूरज परदेशी, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.