पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदीरातून अज्ञात तरूणाने चांदीच्या तीन छत्र्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यात सावखेडा येथील भैरवनाथ मंदीर प्रख्यात असून येथे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी मोठी यात्रा भरते. दरम्यान सध्या कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आल्याने यात्रा भरण्यास पोलीसांकडून मनाई करण्यात आले आहे. मंदीरात असलेल्या ६६ हजार रूपये किंमतीचे दोन किलो वजनाच्या तीन चांदीच्या छत्र्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार १२ जानेवारी रोजी उघडकीला आला आहे.
याप्रकरणी प्रकाश नारायण परदेशी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.