पारोळा । प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडा होळ येथे घरोघरी जाऊन मास्क व साबणाचे वाटप करण्यात येऊन कोरोना बाबत गावात जनजागृती करण्यात आली. कोरोनाने सद्या जगभरात हैदोस घातला असून त्यास घाबरून न जाता आपण स्वतः व आपल्या परीवाराची काळजी घ्या.शासन,प्रशासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करा. गर्दी किंवा समुहाने फिरू नका, खोकलतांना, शिंकतांना,तोंडावर रुमाल किंवा मास्क लावा,तीन व्यक्तींमधील किमान पाच फूट ठराविक अंतर ठेवणे तसेच कोरोना व्हायरस बद्दल घरोघरी जाऊन ग्रामस्थांना सूचना दिल्यात , यावेळी सरपंच हरसिंग नाना पाटील ,ग्रा प सदस्य नंदू राजपूत , ग्रामसेवक चेतन पाटील , तलाठी श्री शेळके आप्पा , रुग्णालयातील श्री मोरे, पोलीस पाटील श्री कोमल पाटील , अंगणवाडी सेविका सौ वंदना पाटील , आशा सेविका माया पाटील , शिपाई प्रकाश पाटील , वाटरमन रमेश पाटील , व ग्रामस्थ उपस्थित होते.