Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणारा भामटा जेरबंद; एलसीबीची कारवाई 
    ताज्या बातम्या

    सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणारा भामटा जेरबंद; एलसीबीची कारवाई 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सामान्य रुग्णालयातून दुचाकी चोरणारा भामटा जेरबंद; एलसीबीची कारवाई 

    जळगाव प्रतिनिधी

    जळगाव शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून चोरीला गेलेली हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तात्काळ कारवाईमुळे पुन्हा मालकाच्या ताब्यात आली आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून, त्याचा साथीदार फरार आहे.

     

    दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी, हनुमान नगर मेहरुण येथील रहिवासी सुरेश पंडित चव्हाण (वय 61) यांच्या मालकीची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्रमांक MH 19 CE 5768) शासकीय रुग्णालय, जळगाव येथून अज्ञात व्यक्तीने चोरी केली. या प्रकरणी सुरेश चव्हाण यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

    एलसीबीची कारवाई:

    तक्रारीनंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली की, सदरची चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसिन शहा सिकंदर शहा (रा. फुकटपुरा, तांबापुरा) याने केली आहे. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने मोसिन शहा याला फुकटपुरा येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने साथीदारासोबत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील मोटरसायकल काढून दिली. मोटरसायकल जप्त करून मोसिन शहा याला पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

     

    ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकूर यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करीत आहेत. फरार साथीदाराचा शोध सुरू आहे, तो देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे.

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif