जळगाव प्रतिनिधी 19-
पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी जैन उद्योग समूह आणि जैन परिवाराला सामाजिक बांधिलकीचा वारसा दिला आहे. हा वारसा जोपासण्यासाठी भवरलाल ण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम जैन इरिगेशन राबवित असते. यामाध्यमातून कांताई नेत्रालयाची सुरवात झाली. कांताई नेत्रालयाच्या पहिल्या शाखेचे चोपडा येथे अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर पुजा करून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, डॉ. अंशु ओसवाल, चोपड्याच्या नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जीवन काका चौधरी, जैन समाजाचे अध्यक्ष गुलाबचंद देसर्डा, महावीर पतपेढीचे चेअरमन शांतीलाल बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला शांतीलाल बोथरा यांची नेत्रतपासणी डॉ. भावना जैन यांनी केली.
जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेने भवरलाल ण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व पुणे अंधजन मंडळ यांच्यातर्फे डॉ. भावना अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची सुरवात 19 जानेवारी 2016 ला करण्यात आली. दोन वर्षात 40 हजाराच्यावर रूग्णांची नेत्रतपासणी झाली तर पाच हजाराहून अधिक रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आला. सेवाभावी संकल्पनेतुन निर्माण झालेल्या कांताई नेत्रालयाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नामांकित कंपन्यांचे दर्जेदार चष्म्यांचे दालन ‘आय केअर ऑप्टिकल्स्’ सुरू करण्यात आले. भवरलालजींनी दिलेला सामाजिक वारसा जोपासण्यासाठी कांताई नेत्रालयाची चोपडा येथे पहिली शाखा सुरू करण्यात आली आहे. चोपडा येथील सहकार नगरमधील महात्मा गांधी कॉलेज समोर, कांताई व्हीजन सेंटर, कांताई नेत्रालयाचे अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी व सहकारी उपस्थित होते. चोपडामधील व पंचक्रोशीतील नागरीकांसह काही मान्यवरांचीही उपस्थिती यावेळी होती.
चोपडा येथील कांताई नेत्रालय कांताई व्हीजन सेंटर येथे मोतीबिंदू, कार्निया, रेटिना विभाग (डोळ्यातील पडद्यासंबधी उपचार) काचबिंदू निदान व उपचार, बालकांना होणारे डोळ्यांचे आजार, तिरळेपणा, जन्मजात, मोतीबिंदू निदान व उपचार, लेझर सेवांमध्ये याग लेझर, ग्रीन लेझर सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व नेत्रदोषांची चिकीत्सा व उपचार केले जातील. अत्याधुनिक उपकरणांव्दारे नेत्रतपासणी करण्यात येईल. यामध्ये ओसीटी, पेरिमेट्री, याग लेझर, ग्रीन लेझर, बी-स्कॅन, फंड्स फोटोग्राफी यांचा समावेश आहे. एअरकुल्ड व एअर कंडिशन, सेमी प्रायव्हेट वॉर्ड, अत्याधुनिक लॅमिनार एअरफ्लोसह सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक फेको मशिनव्दारे फेको शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post