साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करावा – नितीशकुमार

0

पाटणा : नथुराम गोडसेला देशभक्त संबोधून वादात सापडलेल्या मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टीका केली आहे. साध्वीचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे, पण साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपाने विचार करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला. पाटणामध्ये मतदानानंतर नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.

साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याचा निषेधच आहे. त्यांच्यावर काय कारवाई करावी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करावा, असं नितीशकुमार म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंहने नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असं विधान केलं होतं. त्यावर हे साध्वीचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगत भाजपनं सारवासारव केली होती. याप्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर भाजपनं साध्वीला नोटीस बजावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.