चोपडा प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ संचालित ललित कला केंद्र विद्यालयात फलक लेखन व रेखनाचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यासाठी विखरण ता.शिरपूर येथील
साने गुरुजी तांत्रिक विद्यालयातील कलाशिक्षक प्रल्हाद दगडू सोनार यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून संवाद साधला व फलक लेखन-रेखन याचे प्रात्यक्षिक दिले.
प्रात्यक्षिकासाठी कलाशिक्षक प्रल्हाद सोनार यांनी फळ्यावर रंगीत खडू व पावडर पेस्टल या माध्यमांद्वारे त्यांनी सुंदर असे प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे व्यक्ती चित्रण केले. सतत स्केचिंग करत मी आज हा टप्पा गाठला आहे असे सांगत स्केचिंगचे महत्व पटवून दिले या क्षेत्रात एकाग्रता व सतत सराव महत्त्वाचा आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.सोनार यांनी कुठलेही मोजमाप न घेता कोणताही आराखडा न टाकता चित्र फक्त निरीक्षणाद्वारे कसे पूर्ण करता येते.यावर एकाग्रता कशी उपयोगी पडेल ते प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना दाखविले.
या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी प्रल्हाद सोनार सर यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू व शाल देऊन सन्मानित केले.तसेच या ललित कला केंद्राचा माजी विद्यार्थी प्रा.दिनेश साळुंखे आपली कटपुतली कला या जागतिक सेमिनार साठी मलेशिया येथे राष्ट्रीय स्तरावर सलग तिसर्यांदा निवड झाली म्हणून प्रल्हाद सोनार सर यांच्या हस्ते.त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे सिरॅमिक्स डिझाईन अँड ग्लास या शाखेला शांतिनिकेतन,पश्चिम बंगाल येथे जाऊन एम. एफ.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याने या उंच भरारी मुळे भुसावळ येथील देवेंद्र प्रकाश बडे विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.संजय नेवे यांनी सुत्रसंचलन केले. तर प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.साळी प्रा.बारी, प्रा.पाटील, भगवान बारी,अतुल अडावदकर यांनी मेहनत घेतली.तर संस्थेच्या अध्यक्षा सौ.पुनमताई गुजराथी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक सुनिल चौधरी,कलाशिक्षक दिनेश बाविस्कर, भूषण सानप,अर्जुन कोळी, व्हि.डी.पाटील,शकील पिंजारी, नुसरत जहॉ,पी.ए. महाजन, कमलेश गायकवाड, पंकज नागपूरे, वसंत नागपूरे, कापूरे सर आदींनी कला प्रात्याक्षिकाचा स्वाद घेतला.