साधना वाचन प्रेरणा अभियानात सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

0

भडगाव  –  भडगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने वाचन संस्कृती वाढावी, शालेय  विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी, या उद्देश्याने, इयत्ता ५ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी साधना वाचन प्रेरणा अभियान भडगाव तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात आले.

 

अभियानात सहभागी झालेल्या ६०० पैकी सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी बालकमार साधना दिवाळी अंक  या पुस्तकातील मजकुरावर आधारित पुस्तकासह चाचणी परीक्षा [open Book Test] नुकतीच दिली. परीक्षा १०० गुणांची होती. ६० गुणांसाठी ३० प्रश्न पर्यायी स्वरूपाचे असतील. ४० गुणांसाठी २ प्रश्न वर्णनात्मक स्वरूपाचे होते.

सदर परीक्षा दोन गटात घेण्यात आली. दोन्ही गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सुमारे ३०० रुपये किमतीचे दर्जेदार पुस्तक , स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत.

परीक्षेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक बोरसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक मुख्याध्यापक व  शिक्षकांसोबत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी ही परिश्रम घेतले. यात दीपमाला शिंपी, देवेंद्र पाटील, वैशाली पाटील, राजेश पाटील,प्रवीण पाटील, गणेश पाटील व संजय सोनार यांचा समावेश होता. अभियान प्रमुख म्हणून श्री.योगेश शिंपी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here