Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सात गावांच्या सामुहिक पाणीपुरवठा योजनेसाठी आ.चंद्रकांत पाटलांकडून पहाणी
    जळगाव

    सात गावांच्या सामुहिक पाणीपुरवठा योजनेसाठी आ.चंद्रकांत पाटलांकडून पहाणी

    By June 24, 2020No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर (प्रतिनीधी) : उचंदा परिसरात सक्षम अशी एखादी पाणीपुरवठा योजना असावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. आ.चंद्रकांतभाऊ पाटील यानी सदरील योजना हाती घेवून सतत पाठपुरावा करीत 2020-2021 च्या आराखड्यात प्रशासनाच्या मदतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर केलेली आहे. या सात गावांच्या सामुहिक पाणीपुरवठा योजनेला गती मिळावी यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यां सोबत आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी आज 23 रोजी उचंदा व शेमळदे शिवारातील जागेचे स्थळ निरीक्षण करुन पहाणी केली. या योजनेत नदीमध्ये एक आवक विहीर, जॅकवेल, पंपींग मशीन, अशुद्ध पाणी उध्दरण नलिका,शुध्द पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी, जलशुध्दीकरण केंद्र, प्रत्येक गावासाठी पाण्याची टाकी, अशी ही योजना असणार आहे. या योजनेमुळे उचंदा, पुर्णाड, मुंढोदे, शेमळदे, मुंढोळदे, मेळसांगवे, पंचाणे या सातही गावांना 100% नवीन नळ कनेक्शन मिळणार असून या सातही गावांना शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेसाठी अंदाजीत 36 कोटी रुपये एवढा निधी अपेक्षीत आहे असून अंदाजे 10 की.मी.ची संपुर्ण प्रकल्पलाईन असणार आहे.

    या स्थळ निरीक्षण व पहाणी स्थळी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता त्र्यंबक गाजरे, उप अभियंता हर्ष बोहरे, दिलीप पाटील सर, उचंदा येथील सरपंच शेषराव पाटील, बाळू पाटील, रतिराम पाटील, संदिप पाटील, जगन्नाथ पाटील, भगवानदादा कोळी, साहेबराव शिंगतकर, शेमळदे येथील सरपंच विनोद पाटील, वीरेंद्र भोईटे, ब्रिजलाल मराठे, दिपक पवार, स्विय सहाय्यक संतोष कोळी यांची उपस्थिती होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif