सातवीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

0

औरंगाबाद | आई वडील कामावर गेल्यावर सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस आली.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही इयत्ता 7 वित शिकत होती.तिचे आई-वडील दोन्ही फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नित्यनेमाने आई वडील व लहाना भाऊ असे तिघेही फुटाणे विक्री साठी गेले होते.ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता.घराचा बाहेरील दरवाजा बंद होता.तर घरात संजीवनी न्हवती. तिला आवाज दिला असता ती दिसून न आल्याने शेजारी गेली असावी असे घरच्यांना वाटले मात्र काही वेळा नंतर लहान भाऊ जेंव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेंव्हा संजीवणीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अंगलला गळफास घेतल्याचे दिसले त्याने भेदरलेल्या अवस्थेत ही माहिती आई वडिलांना दिली. तेंव्हा हा प्रकार समोर आलं.

 

पोलिसांनी संजीवणीला फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. नेहमी हसत खेळत राहणारी संजवणीने आत्महत्यासारखा टोकाचा पाऊल एवढ्या कमी वयात का उचलला याचे कारण समोर आले नसून या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरिक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.