मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी येथे सातवर्षीय अल्पवयीन मुलीला १०० रुपये देण्याचे अामिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील सुकळी येथील ७ वर्षीय मुलीला १०० रुपये देतो, असे सांगून संशयित धनराज जानराव चौधरी (वय २१, रा. सुकळी) याने रविवारी रात्री सात ते अाठ वाजेच्या सुमारास गावातील एका मोकळ्या जागेत नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धनराज चौधरीविरुद्ध साेमवारी बलात्कार अाणि लैंगिक बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. धनराजला सोमवारी न्यायालयात हजर केले असता भुसावळ येथील पोस्को विशेष न्यायालयाने त्याला १८ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.