लासुर, ता.चोपडा(वार्ताहर) : –गावालगत असलेली सातपुडा पर्वतरांगानी हिरवळीचे स्वरूप प्राप्त केले असून ते वाटसरूंना नयनरम्य आनंद देत आहे.वरूणराजाचे आगमन होताच ओसाड झालेला सातपुडा हिरवेगार झाडाझुडपांनी लादून गेलेला आहे.विविध पक्ष्यांचे किलबिलाट मनमोहक निसर्गाचा आभास करूण देत आहे.
सध्यालॉकडाऊनची परिस्थिती असल्याने मुंबई-पुण्याहून आपल्या गावी परतलेले वयस्कर तसेच तरुण मंडळी आपला फावला वेळ घालवण्यासाठी सातपुडा पर्वताचा सानिध्यात जात असतात.लासुर गावाहून मध्यप्रदेश कडे जाणाऱ्या राज्यमार्ग क्र.१ वर श्रीक्षेत्र नाटेश्वर मंदिराचा काही अंतरावर 1 कि. मी अंतराचा घाट असून रस्त्याचा कडेला अंजन,निंब,बाभूळ प्रजातीची वृक्ष असून घाट संपताच सातपुडा पर्वत पहावयास मिळतो. उन्हाळ्यात ओसाड झालेला सातपुडा वरूणराजाचा आगमनाने हिरवळीत परावर्तित झालेला असून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाटसरू तसेच परिसरातील ग्रामस्थांना रोमहर्षक आनंद देत आहे.