Wednesday, August 17, 2022

सातगाव तांडा येथील तरुणांनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार

- Advertisement -

पाचोरा | प्रतिनिधी

- Advertisement -

सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथे गृपग्रामपंचायत असून सातगाव, गहुले, तांडा ही गावे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये येत असून तांडा या गावांमध्ये गावठी दारू विक्री बंदसाठी गावातील तरुणांनी एल्गार पुकारला आहे. तांड्यासह अनेक गावामध्ये गावठी दारू विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याला पोलिस प्रशासनही तितकेच जबाबदार असून, गावठी दारू बंद करण्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनीच कंबर कसण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तांडा येथील तरुणांनी सुरुवात केल्याचे मानले जात आहे. तांडा येथे दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून यापुढे अजून किती कुटुंबांचा उध्वस्त गावाने बघायचा ? या भावनेतून तरुणांनी दारू बंद करण्यासाठी सबंधित दारू विक्री  करणाऱ्याकडून दारूने भरलेली कॅन हिसकावून गावातून मोर्चा काढला आणि मोकळ्या मैदानात नेऊन दारू भरलेल्या कॅनला पेटवून देण्यात आले. यापुढे जर दारू विकणाऱ्याने गावात दारु विकली तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. असाही तरुणांनी दम भरला.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या