Sunday, November 27, 2022

साखळी उपोषणाचा सोळावा दिवस*

- Advertisement -
 *बेलदार बहुद्देशीय संस्था व मौलाना अब्दुल कलाम आझाद एज्युकेशन सोसायटी द्वारा सहभाग* 
*भारत बंदला जाहीर पाठिंबा* जिल्हाअधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सोळा दिवसापासून सुरु असलेल्या साखळी उपोषणात 8 जानेवारी रोजी जळगाव शहर मुस्लीम बेलदार समाज व बहुउद्देशीय संस्था तसेच मौलाना अबुल कलाम आझाद एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी यांचा सहभाग होता त्याच वेळी आशा वर्कर, शेतमजूर युनियन, जनवादी महिला ,बांधकाम कामगार संघटना, रेशन बचाव समिती, सी आय टी यु  संघटनांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेऊन नागरिकत्व कायद्याला आपला विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत शासनाने एन आर सी कायदा लागू करू नये ही भूमिका सर्वांनी विशद केली.
 उपोषणाची सुरुवात फिरोज बेलदार यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली व समारोप मौलाना हाफिस इब्राहिम यांच्या दुवा ने करण्यात आली.
 *यांची झाली भाषणे*
 हाफिज़ शफिक खलील, पिरजादे अब्दुल हमीद ,मौलाना नसिर खान, मोहम्मद जावेद, पाटील इम्रान शिकलकर, दारा इक्बाल पिरजादे ,मुफ़्ती इम्रान, इक्बाल पिरजादे ,मनोज इंगळे, युसुफ रुस्तमजी, यास्मिन पटेल, कॉम्रेड विनोद आढाव ,वंदना सपकाळे ,कॉम्रेड रंजना सपकाळे, करीम सालार, व  फारुक शेख यांनी संबोधन केले
*दोन संघटनांची निवेदने**
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास कदम यांना पिरजादे अर्थातच मौलाना अबुल कलाम संघटनेतर्फे इक्बाल पिरजादे हाफिस जाहीद पिरजादे, खलील पिरजादे, शब्बीर पिरजादे, आस्था पिरजादे, अन्वर मिस्तरी, जाकिर मिस्तरी व आसिफ शेख यांनी तर बेलदार समाजा तर्फे हाजी इब्राहिम मौलाना, नासिर शेख, सलाउद्दीन, फिरोज हमजा खान, शकील निसार ,इरफान इब्राहिम, एकबाल नदीम वसीम, बशीर खान ,निसार अहमद यांनी निवेदन दिले.
 *यांची होती होती उपस्थीती*
करीम सालार,अनीस शाह,इक़बाल शेख,ऊमर कासिम,इमरान सिकलीगर, अनवर सिकलीगर,ताहेर शेख,तय्यब शेख,सलीम मनियार,हारून शेख,सैयद चाँद,
आबिद सैयद,जलीस शाह,  यांची उपस्थीती होती
- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या