आज 5 वा दिवस ; पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाचे दुर्लक्ष
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरात गेल्या महिन्या पासून पाण्यासाठी जनता त्रस्त झाले असून पाण्यासाठी दाही दिशा वणवण फिरत आहे. जनतेला पाणी बचतीचे व काटकसरीचे आवाहन केले जात आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत साकेगाव जवळील पाईप लाईन फुटण्याचा प्रकार वारंवार गेल्या 5 दिवसांपासून होत आहे . यामुळे लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे.आज दिनांक 17 रोजी सुद्धा दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ही पाईप लाईन फुटली. ही पाईपलाईन फुटते की कोणी मुद्दामहून असे तापदायक प्रकार करीत आहे याचा कसून शोध घेतला पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .
काही दिवसांपूर्वीच या फुटलेल्या पाईप लाईन ला कपलिंग व्दारे जोडण्यात आले होते , परंतु ते काम काळजीपूर्वक केले नसावे म्हणून कपलिंगच्या जवळ जोडणी जवळून हजारो लिटर पाणी वेगाने वाया जात आहे असे समजते . विशेष म्हणजे सदर बाब भर रहदारीच्या रस्त्या लगत असूनही पाणीटंचाईच्या काळात ही बाब प्रशासनाच्या लक्षात कशी येत नाही की संबंधित जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे याबाबत तर्क वितर्क सुरु आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post