साकेगावला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

0

भुसावळ:- भुसावळ तालुक्यातील  महामार्गालगत वाघूर नदी पात्रावर असलेल्या साकेगाव येथील मुस्लीम समाज बांधवांना यांच्या ईदगाह- कब्रस्तानची नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून सात ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन केले. जातीय सलोख्याचे संदेश देत, चमकोगिरी’ला फाटा देऊन ‘फक्त कृतीतुन कार्य केले.

महामार्गालगत असलेले मुस्लीम समाज बांधवांचे ईदगाह-कब्रस्तानमध्ये ५२ सदस्यांनी रविवार सकाळी सात वाजता गावात हजेरी लावली. साफसफाई करताना श्री सदस्यांनी कॅमे-याकडे अक्षर:शा  पाठ केली. कोणतीही चमकोगिरी नाही  फक्त  ‘ कृती’ हा संदेश यातून त्यांनी दिला. शिवाय गावागावात काही समाजकंटक समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात याकरिता  साफसफाई मोहिमेतून जातीय सलोख्याचेही संदेश दिले.

मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला ७ मे पासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्याच्या आधीच श्री सदस्यांनी ईदगाह व कब्रस्तानची साफसफाई केली. यात मुख्य रस्त्याची, मैदानाची सफाई केली. ठिकठिकाणची काटेरी झुडपे तोडून समाधीकडे जाण्याचा मार्गही मोकळा केला. तसेच कब्रस्थानमधील वृक्षांना पाणी टाकले. बैठक व्यवस्थेसाठी वृक्षांच्या खाली साफसफाई करण्यात आली.

शासनाच्या वृक्षारोपण व स्वच्छता अभियान फक्त कागदावर

कोणताही गवगवा नाही. प्रसिद्धी नाही की पैशांची तरतूद नाही. फक्त इच्छाशक्ती व सामाजिक कार्य हाच उद्देश यातून अवघ्या काही तासांमध्ये श्री सदस्यांनी मैदानाची नियोजन करून साफसफाई केली. कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची नोंद  कागदोपत्री राबवना-या शासनाच्या डोळ्यातही अंजन  घातले   वृक्षारोपण मोहिम व स्वच्छता मोहीम कामगीरी कागदावरच असते . मात्र येथे स्वखुशीने व स्वमर्जीने  श्री सदस्यांनी सर्व साफसफाई केली.

गावात श्री सदस्यांनी शंभरापेक्षा जास्त झाडं लावलीच नाही, तर त्याचे संवर्धनही करीत आहे. बोले तैसा चाले या कृतीतून सदस्यांनी यशस्वी अभियान स्वच्छतेने  वृक्षारोपणाने करून दाखवले.

शासनाच स्वच्छता अभियान असो किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो एक झाड लावण्यासाठी १५ लोकांचा गराडा असतो. त्यासोबत सेल्फी, फोटोसेशन पाणी टाकतानाचे फोटो, चमकोगिरी करत लगेच  मिनिटाला सोशल मीडिया वृत्त पत्रांना, प्रसिद्धी माध्यमांना फोटो दिले जातात. काही दिवसांनंतर गवगवा करून लावलेले वृक्ष आहे की नाही याचीही माहिती नसते. मात्र श्री सदस्यांनी कॅमे-याकडे पाठ करत कृतीवर लक्ष केंद्रित करून चमकोगिरी करणाऱ्यांना एक प्रकारचा संदेश दिला आहे.

आज गावा-गावाच्या गल्ली गल्लीमध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. अशा वातावरणात मुस्लीम समाज बांधवांच्या ईदगाह- कब्रस्तानमध्ये स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियान राबवून अखंड भारताचे व जातीय सलोख्याचे दर्शन स्वच्छता अभियानातून दिले.दरम्यान, श्री सदस्यांनी गावातील स्मशानभूमी खेळाचे मैदान भानखेडा येथील स्मशानभूमी याचीही साफसफाई केली.१२ मे रोजी महाराष्ट्रातील जवळपास ७० ते ८० हजार श्री सदस्य औरंगाबाद येथे स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.