साकळी ता. यावल – येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ दि.२६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिवस ‘ साजरा करण्यात आला.या निमित्ताने उपस्थितांच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच मुंबई येथील आतंकवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य राजू सोनवणे,ग्रा.पं.सदस्य शरद बिऱ्हाडे,नाना भालेराव,मनोज बिऱ्हाडे,नितिन अहिरे,जितेंद्र सुरवाडे,चिंतामण सुरवाडे,शंकर जंजाळे यांचेसह अनेक भिमसैनिक व समाजबांधव उपस्थित होते.