साकळी येथे ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’या सर्वेक्षणच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

0

 साकळी ता.यावल (वार्ताहर) शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’या सर्वेक्षण च्या दुसऱ्या फेरीला दि.१५ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली दि.२४ ऑक्टोंबर पर्यंत हा सर्वे चालणार आहे.

यादरम्यान जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दि.१४ ते २४ ऑक्टोबर पर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी ,शिक्षक ,आरोग्य कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड-१९ टेस्ट करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, साकळी येथे रोज ११ ते १२ या वेळेत प्रत्येकाची टेस्ट करण्याचे काम नार आहे आहे.आतापर्यंत तीन दिवसात जवळपास १४५  टेस्ट झालेल्या आहेत. त्यातील ५१ शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव आलेले आहेत. त्याचप्रमाणे आज दि.२० रोजी ४९ जणांच्या केलेल्या कोरोना तपासणीमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे. तरी सर्वे कर्मचारी  यांनी प्रा.आरोग्य केंद्रात येऊन  न घाबरता कोविड-१९ ची तपासणी करून घ्यावी व  आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील व डॉ.सौ. स्वाती कवडीवाले यांनी केलेले आहे.

सोबत फोटो पाठवीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.