साकळी येथील शारदा विद्यालयात एड्स जनजागृती चित्रकला स्पर्धा संपन्न

0

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील शारदा विद्या मंदीर विद्यालयात जागतिक एडस दिनानिमित्त एचआयव्ही/एडस जनजागृती चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वेदांत चंद्रकांत नेवे द्वितीय क्रमांक उज्वला मंगल सोनार तर  तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कोमल सुरेश चौधरी हिला मिळाले आहे.

यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्यामंदीर विद्यालयात २७ जानेवारी रोजी जागतीक एडस् दिनानिमित्त एचआयव्ही / एडस् जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केन्द्र खेल मंत्रालय,  भारत सरकार व जिदंगी फाउंडेशन आणी आधार बहुउद्देशीय संस्था , अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या स्पर्धेत विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आज शाळेच्या परिसरात संपन्न झालेल्या या स्पर्धेस यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य जी पी बोरसे, जे पी पाटील (चित्रकला शिक्षक )सुश्मिता भालेराव, अजय पाटील, लिंक वर्कर अशोक तायडे , लॅब टेकनेशीयन रवीन्द्र माळी , विद्यालयाचे एस .जे . पवार यांनी महत्वाचे परिश्रम घेतले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही / एड्स या संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन केलीत, याप्रसंगी घेण्यात आलेल्या एड्स जनजागृती चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.