साकळी ता.यावल;- येथे दिपावलीचे महापर्व पारंपारीक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले.यात दि.११ रोजी एकादशी, दि.१२ रोजी वसुबारसला गाय-गोऱ्याचे पूजन तर दि.१३ रोजी धनत्रयोदशीला धनाची पूजा आणि दि.१४ रोजी नरकचावदस व सायंकाळी दिवाळी साजरी करण्यात आली त्यानंतर दोन दिवस पाडवा,भाऊबिज साजरे करण्यात आहे .
दिवाळीच्या दिवशी घरोघर धार्मिक वातावरणात घरगुती पद्धतीने लक्ष्मीपूजन तर काही ठिकाणी वहीपूजन करण्यात आले.या पूजनाच्या अगोदर प्रत्येक हिंदूधार्मियघरापुढे रंगीबेरंगी व आकर्षक आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई सह दिव्यांची आरास करण्यात आलेली होती तसेच घरोघर अतिशय सुंदर रांगोळ्या साकारण्यात आलेल्या होत्या.यावेळी दिवाळीचे वातावरण अतिशय मंगलमय व नयनरम्य वाटत होते.लहान मुलांनी फटाके उडविण्याचा आनंद घेतला.दरम्यान साकळी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.निलिमा चंद्रकांत नेवे यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.यावेळी पूजनाची सुंदर आरास-मांडणी करण्यात आलेली होती.पूजनादरम्यान लक्ष्मीमातेचे मनोभावे नामस्मरण करण्यात आले.तथापि कोरोना आजार ,सध्याची वाढती महागाई व गेल्या काळातील शेतीच्या नुकसानीमुळे गावात यंदाच्या दिवाळी सणाचा उत्साह फार कमी होता.मजूर व शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी दिवाळी अगदी नावालाच साजरी केली.