साकळीत आज गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन

0

साकळी ता यावल

सालाबादप्रमाणे यंदाही साकळी येथील महात्मा फुले चौकातील ग्रा पं.शॉपिंग कॉम्प्लेक्स मागील भागातील रहिवाशी गजानन भक्त कै. ह.भ.प.दामू चुडामण तेली यांचे घरी दरवर्षाप्रमाणे या वर्षीही गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून हे सोहळ्याचे ९वे वर्ष आहे त्यानिमित्ताने सकाळी ८ वाजता गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व १० वाजेपासून महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच संध्याकाळी ८ वाजता महिला कीर्तनकार शारदाताई मलकापूरकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी साकळी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादासह किर्तनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नितीन दामोदर तेली व दिलीप दामोदर तेली यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.