साईमतचे पत्रकार गणेश शिंदे यांचे पाहुणे मा सरपंच पंढरीनाथ पाटील यांचे निधन

0

पाचोरा प्रतिनिधी :    साईमत पत्रकार गणेश शिंदे पाहुणे यांचे डोगरगांवचे माजी सरपंच व सदस्य पंढरीनाथ मागो पाटील उपचारा दरम्यान निधन झाले. डोंगरगावचा खरा जनसामान्यांचा देव माणूस, एक सच्चा समाजसेवक पंढरीनाथ मागो पाटील आपल्यातून काळाने हिरावला आहे. गावांतील सरपंच म्हणून आपल्या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच गोरगरिबांचा समाजसेवक पंढरीनाथ खरंच माणुसकी जपणारा देव माणूस होता. आज दुपारी ३.३० वाजता त्यांचे निधन झाले. ही घटना संपूर्ण गावात व परिवारासाठी धक्कादायक आहे.

पंढरीनाथ पाटील हे डोंगरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सद्यस्थितीत सदस्य होते. तसेंच जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थेचे सदस्य होते. पंढरीनाथ पाटील हे गावात कोणीही आजारी पडले किंवा वैद्यकीय उपचार करायचे असले तर स्वत: हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा करून सहकार्य करीत असत. काही रुग्णांना स्वतः घरून जेवणाचा डब्बा पुरविणे व आर्थिक मदत करणे हे माणुसकीचे काम करायचे तसेच लग्न कार्यात देखील आर्थिक सहकार्य करायचे शेवटी समाजात समाजसेवक करण्याचे काम त्यांनी कोरोना संसर्ग महामारी सुद्धा रुग्णालयात दाखल होईस्तोवर, अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले.

त्यांची संपूर्ण कारकीर्द ही अतिशय प्रामाणिक जनसेवक म्हणून राहिली आहे. गावात अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. जनतेत राहणारा, एक पंढरीनाथ पाटील सारखा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांचे पाश्चात्य आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, जावई, नात असा मोठा परिवार आहे. ते साईमतचे पत्रकार गणेश शिंदे यांचे पाहुणे होते. त्यांचे निधनाने गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.