पारोळा– प्रतिनिधी
येथील पंचायत समितीचे माजी सभापती व सांगवी ता,पारोळा येथील रहीवाशी दगडु चुडामण पाटील (वय 54) यांनी स्वत:च्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना ता,11 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहीतीनुसार खबर देणार पंकज पाटील व त्याची आई व बहीण हे सकाळी शेतात कामासाठी गेले होते.व दगडु पाटील हे घरीच होते.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातील मंडळी ही शेतातुन घरी आल्यावर घराचा दरवाजा आतुन बंद होता.तेव्हा दगडु पाटील यांना आवाज दिला असता त्यांनी काही एक प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे गावातील लोकांच्या मदतीने दरवाजा तोडुन प्रवेश करुन पाहीले असता दगडु पाटील यांनी घराच्या छताला सुती दोरीने बांधुन गळफास घेतलेला दिसला.यावेळी खाजगी वाहनाने कुटीर रुग्णालय येथे डाँक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले.
याबाबत पारोळा पोलिसात पंकज पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तपाल हवलदार प्रकाश पाटील करित आहे.