किनगांव प्रतिनिधी :

मुस्लिम धर्मात रमजान हा सर्वात पविञ महिना मानला जातो.या महिन्यात अत्यंत कङक असे उपवास केले जातात.त्याला रोजे असे म्हणतात.किनगाव येथील सहा वर्षीय मुसद्दीख युनुस शेख या चिमुकल्याने रोजा करून सर्वांची शबासकी मिळवली आहे.
रमजानच्या महिन्यात जो रोजे करतो तो पुण्यवान ठरतो.अशी मुस्लिम समाजाची धारणा आहे.उपवास करण्याची एक अनोखी पध्दत असुन पहाटे उठून नमाज अदा करून या उपवासाला सुरूवात करावयाची असते.एकदा उपवास धरला की दिवसभर पाणीही प्यायचे नसते.
यंदा उन्हाळ्यात उपवासा धरल्याने मुसद्दीखच कौतुक वङील युनुस शेख, काका शेरखाॅ पठाण, शेख नबी गुत्तेदार, आजी रशीदाबी शेख,महेवीन शेख, मदिहा शेख, व सर्व नातलगांनी केले आहे.

