सहजयोगात येणार्‍या मंडळींनी त्यात टिकून राहिले पाहिजे

0

कित्येक गोष्टी आपण काय घडत आहे, हे नजरेने पहातो.तरी सुध्दा देवळात जाऊन अंधश्रध्देने अनेक गोष्टी करतो. परमेश्वराच्या नावावर एका मागोमाग दुसरे अशी अनेक पापे आपण करत असतो. पापक्षालन करण्याऐवजी आपल्या पापांची वृध्दीच करत असतो. अशा लोकांना मी… तामसी… म्हणूनच संभोवते. अशी मंडळी त्यांचे डोके जरासुध्दा चालवत नाहीत. म्हणूनच त्यांना… मूढ बुध्दी… चा म्हटले पाहिजे. अशी मंडळी कुणाही व्यक्तीकडे आकर्षित होतात.किंवा कुणी त्यांना काही चमत्काराच्या गोष्टी सांगितल्यावर लगेच अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतात.चमत्कार करणार्‍या मंडळींनी परदेशात जाऊन तर अनेकजणांकडूनच पैसे उकळले आहेत व त्या पैशाबद्द्ल त्यांनी पक्षाघात किंवा डोकेदुखी वेडेपणा अशाप्रकारचे रोगही त्या बरोबर दिले. इतके असूनही अनेक जण अशा चमत्कार करणार्‍या मंडळींच्या मागे वेड्यासारखी धावत आहेत व आपल्या पापात वृध्दी करून घेत आहेत.
आपणाकडे जेवढा वेळ मिळाला आहे.तो फार आणिबाणीचा व महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपण स्वत:च साधना करून परमेश्वराच्या हृदयातील अतिउच्च स्थान प्रकारच्या लहरी येतात. अजाणतेपणाने आपण अनेक पाप करत रहाल व तरी सुध्दा आपण मला म्हणाल की माताजी मला चैतन्यलहरी येत आहेत, मी उत्तम आहे, अशी माणसं स्वत:ला व दुसर्‍यांना फसवितात. तुमचा निर्णय कोण करणार? तुमचच कर्म! तुम्ही दुसर्‍यांवर किती उपकार केले?
एखाद्या मोहिनी विद्येच्या माणसावर भुलून जाऊन तुम्ही आपल्या घरातील इतरांची नासाडी करू इच्छिता काय?का? निदान घरातील इतर मंडळींचा विचार करा. समाजात अनेक प्रकारची गैेर माणसं आहेत;परंतु अशांना तिलांजली देणे सहजयोगात सहज शक्य आहे.. लंडनमध्येसुध्दा माझ्या माहितीत अनेक गैरप्रकारची, भुलणारी माणसं आहेत. मी अशा लोकांना अनेकदा बजावलं आहे की तुम्ही वाईट मार्ग सोडून द्या. तुम्ही तात्काळ ओळखलं पाहिजे की, आपल्या आईला या सर्व गोष्टी कळतात; आणि जर आईने एखादी गोष्ट
सांगितली तर ती ऐकली पाहिजे. त्याच्यात वाद घालून होणार नाही. नाहीतरी वाद घालून आपणास चैतन्य लहरी मिळणार आहेत का? असा विचार करा. पण अजूनही सहजयोगात येऊनसुध्दा तुम्ही चुका करू शकता आणि जर असं झालं तर ती फार वाईट गोष्ट आहे. हे समजून घ्या की, अशा योगभ्रष्ट लोकांना गती मिळणार आहे नाही. मला सर्व सहजयोग्यांना सुध्दा इशारा द्यावयाचा आहे. तुम्ही सहजयोगच अखेर चा निर्णय आहे. तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यास योग्य आहात की नाही याचा निवाडा म्हणजेच सहजयोग आहे. तुम्ही सहजयोगात येऊन पार झाल्यावर परमेश्वराच्या राज्याचे नागरिक बनू शकता. त्या व्यक्तिरिक्त परमेश्वरी प्रेमाबद्द्लची संपूर्ण श्रध्दा इत्यादी समजून घेण्याची पात्रतासुध्दा नसते. समजा आपण भारतीय गणराज्याचे नागरिक आहोत व आपण एखादा गुन्हा केला तर आपण योग्य शिक्षेस पात्र ठरू शकतो. तव्द:च परमेश्वरच्या राज्यबद्द्ल आहे व म्हणूनच परमेश्वराच्या राज्याचे नागरित्व मिळाल्यावर आपण सर्वांनी फारच सावधतेने रहावयास हवे..!

Leave A Reply

Your email address will not be published.