Sunday, May 29, 2022

सहकार पॅनलच्या शैलजादेवी निकम विजयी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवार शैलजादेवी निकम यांनी विजय मिळवला आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये महिला राखीव उमेदवारीवरून देखील मोठे वाद झाले होते. ही जाग कॉंग्रेसला मिळून यात विद्यमान संचालिका अरूणा पाटील यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील यांनी धरला होता. मात्र त्यांच्या ऐवजी जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या अध्यक्षा शैलजादेवी निकम यांना रोहिणीताई खडसे यांच्या सोबतीने उमेदवारी मिळाली. यातूनच डी. जी. पाटील यांनी इतर उमेदवारांच्या मदतीने शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. मात्र यात या पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

आज झालेल्या मतमोजणीत  शैलजादेवी निकम यांना निर्णायक आघाडी प्राप्त झाली असून त्यांचा विजय निश्‍चीत झाला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या