लोकशाही न्यूज नेटवर्क | जळगाव :
सहकार क्षेत्रातील भिष्म पितामह ग.स. सोसायटीचे ज्येष्ट मार्गदर्शक, सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. आबा पाटील (वय-82)यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 10 रोजी राहत्या घरुन निघणार असून पिंप्राळा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्यमान अध्यक्ष उदय पाटील हे त्यांना गुरुस्थानी मानत होते.
शिवसेना परिवाराला अतिव
दु:ख – गुलाबराव वाघ
समाजात, राजकारणात, सहकारात व सार्वजनिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तबगारीने मोठेपण सिद्ध केले.तसेच ग.स.सोसायटीच्या रोपट्याचं ज्यांनी वटवृक्षात रुपांतर केले.अशा समाजासाठी व ग.स.सोसायटी साठी जीवन समर्पित करणाऱ्या ग.स.सोसायटी सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष आदरणिय आबासाहेब बी.बी.पाटील यांच्या दुःखद निधनाने शिवसेना परीवाराला अतिशय दुःख झाले.ही दुःखद बातमी ऐकताच मन सुन्न झाले.
कै.बी.बी.आबांच्या दुःखद निधनाने त्यांचे चिरंजीव श्री.किरण दादा पाटील,कै.आबांचे लहान भाऊ श्री.प्रकाश नाना पाटील व भार्डूकर सोनवणे परिवाराला जे दुःख झाले.त्या दुःखात मी व माझा वाघ परिवार , धरणगाव सहभागी आहोत.परमेश्वर त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो.हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
कै.बी.बी.आबांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना.