सव्वीस लाख ४५ हजार ६०० रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

0

किनगाव ता.अहमदपूर प्रतिनिधी : 

येथील पोलिसांनी अहमदपूर-किनगाव रोडवर मानखेड पाटीजवळ बुधवारी रात्री सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपयांचा देशीदारू सह मुद्देमाल जप्त केला.

दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री साडे सहा वाजता किनगाव-अहमदपूर रोडवर मानखेड पाटी जवळ विनापास परवाना बेकायदेशीररित्या ताब्यातील वाहन फोर्ड इंडेव्हर कंपनीची गाडी क्रमांक पी वाय ०५ के ०१७८ मध्ये ४० खपटी खोक्यामध्ये देशी दारूच्या १९२० बाटल्या त्याची किंमत ८० रु प्रमाणे १५३६०० रु व टाटा कंपनीची चारचाकी माल वाहतूक गाडी क्र एम एच ४४-५१२३ मध्ये ५० खपटी खोक्यामध्ये देशी दारूच्या २४०० बाटल्या त्याची किंमत ८० रु प्रमाणे १९२००० रु ची दारू जप्त केली. एकूण देशी दारू ३४५६०० रुपयांची तर फोर्ड इंडेव्हर कार ची किंमत २०००००० रुपये तर टाटा मालवाहतूक चारचाकी गाडीची किंमत ३००००० रु असा एकूण २६४५६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी करीत कार्यवाही केली.सपोनि शैलेश बंकवाड यांच्या फ्रियादी वरून गु.र.नं.९०/२१ कलम ६५ अ.इ.८१,८३ म.दा.का.नुसार आरोपी सोमनाथ अशोक फड रा धर्मापुरी ता परळी जिल्हा बीड,मानाजी रक्षराज भताने रा भतानवाडी ता अंबेजोगाई जिल्हा बीड,सचिन रमेश पुजारी रा धर्मापुरी ता परळी जिल्हा बीड,शंकर ज्ञानोबा फड रा धर्मापुरी ता परळी जिल्हा बीड,पांडुरंग माणिक चाटे रा खापरटोंग ता अंबेजोगाई जिल्हा बीड,परमेश्वर राघू पांचाळ रा धर्मापुरी ता परळी जिल्हा बीड यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.