सव्वा लाख रूपयांची लाच स्वीकारतांना प्रांताधिकार्‍यांसह लिपीकास अटक

0

जळगाव (प्रतिनिधी) । वाळू वाहतुकदाराकडून ट्रक सोडविण्यासाठी सव्वा लाख रूपयांची लाच पंटरमार्फत ती स्वीकारणाऱ्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपीक अतुल अरुण सानप या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)ने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रांताधिकारी व लिपीकाविरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना असतांना सदर वाळु वाहतुक करणार्‍या दोन ट्रक जळगावच्या तहसिल पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केले होते. संबंधीत ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या वतीने लिपीक अतुल अरूण सानप यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २,००,०००/-रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १,२५,०००/-रुपये लाचेची मागणी करण्यात आली. दरम्यान, या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचून लिपीक सानप यांच्या खाजगी पंटरने स्वीकारली. याचवेळी त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरात करण्यात आली. यात सध्या तरी पंटर आणि संबंधीत लिपीक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना मात्र अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.

यांनी केली कारवाई
सुनील कडासने सो (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांच्या मार्गदर्शनखाली ला.प्र.वि.जळगाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.