सवतखेडा येथील विवाहीतेची आत्महत्या

0

जामनेर(प्रतिनिधी) : –तालुक्यातील सवतखेडा येथील जिजाबाई धनराज ईंगळे (वय ३३) या विवाहीतेने पतीच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली. घटना समजल्यापासुनच मयतचा पती धनराज गावातुन फरार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यापुर्वीही विवाहीतेने विहीरीत उडी टाकुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा विवाहीता वाचली होती,यावेळी मात्र नव्यानेच बांधले जात असलेल्या ईमारतीतील पंख्याच्या कडीला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली.

पती,सासुवर गुन्हा दाखल

वरील घटनेप्रकरणी मयत विवाहीतेची मुलगी शितल ईंगळे हिच्या तक्रारीवरून धनराज नथु ईंगळे (पती),व कलाबाई नथु ईंगळे (सासु) अशा दोघांवर विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त करणेसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.