सलून व्यवसाय पूर्ववत सुरू करावा ; नाभिक संघाच्या वतीने तहसीलदार मोरे यांना निवेदन

0

चाळीसगाव(प्रतिनिधी) :- श्री संत सेना महाराज नाभिक संघ चाळीसगाव यांच्या वतीने आज चाळीसगाव येथे तहसीलदार श्री अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नाभिक समाजाचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत चालू करावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे .

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये मिनी लॉकडाऊन, ची घोषणा केली आहे आणि त्या लॉकडाऊन  मध्ये सर्व व्यवसाय सोडून फक्त सलून व्यवसाय बंद राहील अशी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महाराष्ट्रातील नाभिक समाजावर फार मोठा अन्याय झाला आहे, मागील लॉकडाऊन च्या काळामध्ये नाभिक समाजातील सलून व्यवसायिक यांचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे .लॉकडाऊन  उठल्यानंतर सलून व्यवसायिक धारकाने घरातील दाग दागिने विकून आपली दुकान भाडे ,घर भाडे, व वीज बिलाचाभरणा केला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरतांना नाभिक समाज मेथाकुठीस आला आहे. अशातच आता यावर्षी सुद्धा  लाकडाऊन करून सलून व्यवसायावर बंदी घातलेली आहे.  त्यामुळे नाभिक समाजातील जनतेने जगावे कसे ?हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

या लाकडाऊन च्या काळात नाभिक समाजाचे तरूण कार्यकर्ते श्री गणेश सुभाष सैंदाणे वय 32 राहणार वैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी आर्थिक अडचणी मुळे दि.७/४२०२१  रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तरी  त्याच्या कुटुंबियांस शासनाने नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये जाहीर करावी अशीही मागणी नाभिक समाजाने केली, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास नाभिक समाज, नाभिक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल , यावेळी काही परिस्थिती उद्भवल्यास याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनात पुढील मागण्या नाभिक संघाने केल्या आहेत ,सलून दुकाने पूर्ववत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी ,सर्व वयोगटातील सलून कारागीर व व्यावसायिकास तात्काळ कोरोना लस देण्यात यावी , कोरोना काळातील आत्मा हत्या ग्रस्त सलून व्यवसायिकांच्या कुटुंबियांस त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. अशा मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर चाळीसगाव संत सेना नाभिक संघाचे अध्यक्ष शिवाजी बहाळकर, उपाध्यक्ष शिवानंद महिंदळे,  सेक्रेटरी किरण  दत्तात्रय नेरपगार, नीलेश महाले, गणेश सोनवणे, प्रवीण गवळी, अदी नाभिक समाजाच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.