सलमान खानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध फर्स्ट लूक ठरतोय लक्षवेधी

0

मुंबई :- बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटातील सलमानचा हा लूक लक्षवेधी ठरतोय. सलमानसोबतच यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. यावर्षी

‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे. वयोवृद्ध लूकमधील हा पोस्टर शेअर करत सलमानने लिहिले, ‘जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी मै है, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है.’ सलमानच्या या पोस्टरने नक्कीच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफसुद्धा पाहायला मिळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.