सलग 40 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर; नवे दर जारी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क

देशात सलग 40 व्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधानांचे दर आजही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-ऊतार होत आहे. परंतु, तरीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही.

भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले असून आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.08 टक्क्यांनी वाढून $74.48 वर पोहोचली. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढून $71.20 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत  पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात  पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत  95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

दरम्यान, पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क सध्या 27. 90 रुपये इतकं आहे. तर, डिझेलवर 21.80 रुपये आहे. राज्यात केवळ मूळ उत्पादन शुल्कातून वाटा मिळण्याचा अधिकार आहे. कर आकारणीच्या एकूण बाबींपैकी पेट्रोलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.40 रुपये प्रति लीटर आहे. याचबरोबर विशेष अतिरिक्त उत्पादक शुल्कात 11 रुपये आणि रस्ता तसेच पायभूत सुविधेवरील उपकर 13 रुपये प्रति लीटर आकारला जातो.

कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरण  2.50 रुपये आकारला जातो. त्याचप्रमाणे, डिझेलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.80 रुपये प्रति लीटर आहे. विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर म्हणून प्रति लिटर 8 रुपये आकारला जातो. तर, 4 रुपये प्रति लिटर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील आकारला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.