मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दर ८६.३६ रुपये झाला आहे. तर डिझेल ७७.२४ रुपये झाले. रविवारी पेट्रोलचा भाव ८६.०२ रुपये तर डिझेलचा भाव ७६.६७ रुपये होता.
दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७९.५६ रुपये झाला. त्यात ३३ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल ८१.२७ रुपये झाले आहे. तर चेन्नईत पेट्रोलने ८२.८७ रुपयांचा स्तर गाठला आहे. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७८.८५ रुपये झाला. त्यात ५८ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७४.१४ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७६.३० रुपयांचा स्तर गाठला आहे. आज चेन्नईत डिझेल ५० पैशांनी महागले आहे. रविवारी दिल्लीमध्ये पेट्रोल ७८.८८ रुपयांवरून ७९.२३ रुपयांवर गेले. राजधानीमध्ये डिझेलचा दर ७७.६७ वरून ७८.२७ रुपयांवर गेला.
रविवारी (२१ जून) पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची, तर डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ करण्यात आली होती. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.९७ रुपये तर डिेझेलच्या दरात ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे. ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली होती

