सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, वाचा तुमच्या शहरातले दर

0

मुंबई : गगनाला भिडलेल्या पेट्रोल, डिझेलचे दर आता उतरायला सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. आज देशभरात पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा मुद्दा डोकेदुखी ठरू नये म्हणून कंपन्यांनी इंधन दर कमी केल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. काल बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले आहे.त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.२० रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे.

आज गुरुवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.९८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.८२ रुपये असून डिझेल ८५.७४ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.३७ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.८१ रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.