डॉ देवदुत बनल्याची पेशन्ट ची भावना
धरणगांव (प्रतिनिधी) : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असुन, आपण समाजाचे काही तरी दायित्व लागतो असे मनात आले धरणगाव चे माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया याचे, त्यांनी गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख याचां जवळ बोलुन दाखवलं की शिवसेना जर पेशन्ट ला मसाले हळद दुध 15 दिवसा पासुन देत असेल तर मी हि काही तरी केलं पाहिजे अशी भावना झाली, आणि त्यांनी चक्क त्याचां घरुन 20 दुध बनवुन, पारले बिस्किटे सुद्धा आणले, दुध एक दिले काय, 15 दिवस दिले काय, त्या मागची भावना महत्वाची आहे, आज सकाळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याच्या उपस्थित पेशन्ट ला दुध वाटप केले, ते धरणगांव सकल जैन समाजाचे अध्यक्ष आहेत.
दोन दिवस अगोदर जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक अक्षय मुथा यांनी सुद्धा कोविड पेशन्ट ला जो युमेनिटी पावर वाढवतो असा आवळा मुरब्बा व फळे वाटप केले. धरणगाव येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल जैन उपाध्यक्ष प्रतिक जैन, सचिव श्रेयास जैन , यांनी कोविड पेशन्ट ला रेमडीसीव्हर इंजेक्शन लागत असते, त्याची माफक किमतीत धरणगाव व जळगांव येथे विविध मेडिकल वर व्यवस्था करुन दिली, व फोन ने शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचा शी संपर्क साधुन बरीच मेडिकल ची व्यवस्था करुन दिली.
जगदंबा अॅक्वा चे वाल्मिक पाटील, वासुदेव चौधरी, प्रशांत पाटील यांचे कडून पाण्याचे जार ची मदत होत आहे
आज दुध वाटप कामी अक्षय मुथा, वार्ड बाॅय विशाल माळी, दिनेश पाटील, सिक्युरिटी गार्ड नामदेव मराठे, विजय पाटील, बाळा विसावे, अमोल सखाराम माळी यांनी सहकार्य केले.
ग्रामीण रुग्णालयात वरील सर्व वार्ड बाँय, सिक्युरिटी गार्ड उत्तम प्रकारे सेवा देत आहे, सर्व पेशंटला धरणगांव कोविड सेंटर आपले घर वाटत आहे, अशी सेवा डाॅ बन्सी याचां मार्गदर्शन खाली डाॅ मयुर जैन,डॉ चन्द्रकांत पाटील ,डॉ कांचन वाणी, हर्षदा पालिवाल, डॉ मोसिन शहा, डॉ महेश कोळंबे, डॉ संदिप पाटील, डॉ जगताप व जयश्री महाले व नऊ नर्सस, आॅफिस स्टाॅप, रुग्णवाहिकांचे चालक अविनाश चौधरी, ईश्वर ठाकुर, न पा चे अरुन पाटील, निलेश महाजन, स्वप्नील चौधरी, टायलेट ला पाणी पुरवण्याचे काम देवा तायडे व रवी वाघमारे, डेड बाॅडी पॅकिंग चे काम राजु करोसीया, कोविड बाॅडी घरी न नेता अंत्यविधी संस्काराचे कार्य कोविड स्वच्छता निरीक्षक निलेश वाणी व त्यांची टिम यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे, म्हणून पेशन्ट घरी जातांना समाधान व्यक्त करीत आहेत.
या ठिकाणी पेशन्ट ला काही अळी अडचणी असल्या तर सोडवण्यासाठी दिवसभर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे,वासुदेव चौधरी, काँग्रेसचे विकास लांबोळे, रामचन्द्र महाजन, नंदलाल महाजन, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, योगेश वाघ, धिरेंद्र पुरभे,, डी जे पाटील,राहुल रोकडे, किशोर मराठे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, विनोद रोकडे, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, , सागर दुर्गे, भाजप चे नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, यांचे सहकार्य लाभत आहे.