सर्व शासकीय कार्यालय व शाळांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांची प्रतिमा लावा

0

अमळनेर-मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक,दर्पणकार तथा आद्य पत्रकार बाळशास्त्रीजी जांभेकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालय व शाळांमध्ये लावावी,पुढील वर्षी वरील सर्व ठिकाणी बाळशास्त्रीजींची जयंती साजरी करावी व शालेय पाठ्यपुस्तकात बाळशास्त्रीजीवर धडा घेण्यात यावा आदी तीन ठराव अमळनेर येथे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात करण्यात आले.

आद्य पत्रकार बाळशास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त दि 6 जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन मराठी वाड्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहात करण्यात आले होते.यावेळी संघटनेच्या झालेल्या बैठकीत वरील तीन ठराव करून याबाबत शासनास निवेदन देऊन या मागण्यांसाठी सर्व स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यास सर्वांनी अनुमोदन दिले.तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन राजपूत व सचिव पदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्याची सूचना राजेंद्र पोतदार यांनी मांडल्याने सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली,सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले.तसेच पत्रकार भवनाच्या पूर्णत्वासाठी आमदार अनिल पाटील यांच्याकडेही निधीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

दरम्यान बाळशास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त प्रतिमपूजन व माल्यार्पण माजी आ डॉ बी एस पाटील,कृषिभूषण साहेबराव पाटील, श्रीमती स्मिता वाघ,शिरीष चौधरी,जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमा पाटील, न प च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील,जेष्ठ पत्रकार पंडित चौधरी, महेश देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कृषिभूषण पाटील यांनी अमळनेर पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी पालिकेच्या माध्यमातून सुमारे 8 कोटी किमतीचा भूखंड दिला असून त्याठिकाणी कंपाऊंड चे काम देखील सुरू झाले आहे,लवकरच भव्य पत्रकार भवन त्याठिकाणी उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली,याशिवाय आगामी न प च्या सभेत बाळशास्त्रीजींची प्रतिमा न प कार्यालयात व शाळांमध्ये लावण्याचा ठराव करण्याची विनंती नगराध्यक्षा व सदस्यांना करू अशो ग्वाही दिली.तर शिरीष चौधरी यांनी देखील अमळनेरात पत्रकार भवन व्हावे हे आपले स्वप्न होते,त्याचे भूमिपूजन देखील आपण करून निधीची तरतूद केली आहे,कोणत्याही परिस्थितीत हे भवन उभे राहणारच आहे,मात्र विरोध करणाऱ्यांना देखील पत्रकार बांधवांनी लक्षात ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.पत्रकार भावनांस चालना दिल्याबद्दल शिरीष चौधरी व कृषिभूषण पाटील या दोन्ही मान्यवरांचा सत्कार पत्रकार संघातर्फे करण्यात आला.तर दगडी दरवाजाचा अडचणीचा प्रश्न आमदार अनिल पाटील यांच्या सहयोगाने सोडविल्याबद्दल कृषिभूषण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.माजी आ स्मिता वाघ व डॉ बी एस पाटील यांनी बाळशास्त्रीजींचा असा सन्मान करणारे ठराव महाराष्ट्रात    प्रथमच झाले असल्याने कौतुक करत शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.तर खा शि मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल,मुख्याध्यापक रणजित शिंदे आदींनी आपल्या संस्थेमार्फत या ठरावाप्रमाणे मागणी करण्याची ग्वाही दिली.

पत्रकार बांधवातून संजय पाटील,राजेंद्र पोतदार व चेतन राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले,यावेळी विशेष कामगिरी तथा विविध पदांवर वर्णी लागल्याने संजय पाटील,राजेंद्र पोतदार,जितेंद्र ठाकूर,बाबूलाल पाटील,हिरालाल पाटील,संभाजी देवरे आदींचा सत्कार करण्यात आला.तर अंबरीश महाराज टेकडीवर पक्षीमित्र म्हणून विशेष लोकप्रिय ठरलेले सुनिल भोई यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, शिवसेनेचे विजू मास्तर, न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नप पतपेढी चे चेअरमन सोमचंद संदानशिव,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक शाम पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील,भाजप सरचिटणीस राकेश पाटील,सानेगुरुजी स्मारक समितीच्या दर्शना पवार,गुप्तवार्ता चे डॉ शरद पाटील,ग्रामसेवक संघटनेचे दिनेश साळुंखे,नगरसेवक प्रवीण पाठक, बाळा संदानशिव,अनिल महाजन यासह असंख्य मान्यवरांनी भेटी देऊन पत्रकार बांधवांचा सन्मान केला.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.

कार्यक्रमास चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील,राजेंद्र पोतदार,संजय पाटील, महेंद्र रामोशे,जितेंद्र ठाकुर,योगेश महाजन,आबीद शेख,मुन्ना शेख,काशिनाथ चौधरी,विनोद खैरनार,विजय पाटील,हिरालाल पाटील,डॉ विलास पाटील,महेंद्र पाटील,सदानंद पाटील,संभाजी देवरे,बाबूलाल पाटील,वसंत पाटील, समाधान मैराळे, रोहित बठेजा, संजय मरसाळे,श्यामकांत पाटील, गजानन पाटील,अरुण पवार,संजय सुतार,गौरव पाटील,संजीव पाटील,संजय सूर्यवंशी यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.