सर्वोच्च न्यायालयाचा कलम 370 च्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि त्यानंतर त्या भागात प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर लावण्यात आलेले निर्बंध यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतू, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रंजन गोगोई यांनी या प्रकरणावर सुनावणी करण्यात नकार देत नव्याने याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात एम.एल.शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रंजन गोगोई यांनी याचिकेत त्रुटी असल्याचे सांगत सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच त्रुटींमध्ये सुधारणा करून पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तसेच न्यायाधिशांनी आज दाखल केलेल्या याचिकांमधील 4 याचिकांमध्ये त्रुटी असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.